hero-image

ग्रामपंचायत कर आकारणी करिता परिपूर्ण सॉफ्टवेअर

संगणकीकरण हि आता काळाची गरज असून, आता दैनंदिन कामकाजामध्ये अचूकता, तत्परता तसेच पूर्ण कार्यक्षमतेची गरज भासत आहे.

सध्याच्या युगात नागरिकांना अचूक तत्पर आणि आधुनिकरित्या सेवा देणेचे भाग पडत आहे आणि यासाठी 'संगणकीकरण' हा एकमेव आणि शेवटचा पर्याय आहे.

आमच्याशी संपर्क साधा
शासन नियमानुसार

ग्रामनिधी हे सॉफ्टवेअर संपूर्णतः ग्रामपंचायत अधिनियम १९५८ ला आधारभूत मानून विकसित करण्यात आलेले आहे.

विविध नमुने आणि अहवाल

ग्रामनिधी सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असलेले विविध नमुने हे लेखा संहिता २०११ नुसार प्रमाणित केलेले आहेत.

वापरण्यास सोपे आणि सुटसुटीत

उपलब्ध असलेले विविध नमुने यांची वेगवेळ्या विभागामध्ये विभागणी केलेली असल्याने वापरण्यास सोपे आणि सुटसुटीत आहे.

जलद आणि सुरक्षित

उच्च गुणवत्तेसाठी वचनबद्ध

  • सिनर्जी सिस्टिम्स हे संगणकीकरण क्षेत्रातील अग्रगण्य नाव आहे. या नावाखाली सम विचाराची आणि सहकार्याची भावना मनात ठेवून एक संपूर्ण एक संघदिलाने काम करीत असतो.

  • जगभरातील व प्रगतीच्या घोडदौडीमध्ये आपल्याला हि मागे राहता येत नाही. संगणकीकरण एक साधन आहे. आपल्या कार्यक्षमतेला अधिक व्यापक स्वरुपात चालना देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

  • अर्थात, हे सर्व अनेकांच्या मेहनतीचे व शोध प्रक्रियेचे फळ आहे. तसेच यामध्ये अनेक संस्था मान्यवरांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शनही अंगीभूत आहे.

content-image
स्मार्ट टीम

आम्ही आय.टी. क्षेत्रातील तज्ज्ञांचा असा समूह आहोत, जो आपले ज्ञान आणि अनुभव ग्रामपंचायत संगणकीकरण करण्यासाठी कल्पकतेने वापरतो.

शाश्वत उपाययोजना

आमची काळजीपूर्वक डिझाइन केलेली मोड्यूल्स महत्त्वाच्या कामकाजाच्या गोष्टी सुलभ करतात.

मजबूत समर्थन सेवा

तुम्हाला कधीही संवाद साधण्याची आवश्यकता असेल, आमच्यापर्यंत पोहोचणे सोपे आहे. आमच्या सपोर्ट टीमचे संपूर्ण सहकार्य आपल्याला असते.

समाधानकारक परिणाम

आम्ही तुम्हाला तुमच्या सर्वात महत्त्वपूर्ण कामांबाबत जाणीव करून देतो आणि ते पूर्ण करण्यासाठी मार्ग सुचवतो.

मालमत्ता कर आकारणी

शासन नियमानुसार सुधारित दराने मालमत्ता कर, दिवाबत्ती कर, आरोग्य कर आणि व्यवसाय कर आकारणी विभाग

मालमत्ता धारकाचे स्वयंमूल्यमापन

सोप्या पद्धतीने मालमत्तेची नोंदणी करताना महसुली गाव, प्रभाग, रस्ता/विभाग, मालमत्तेचा प्रकार या नुसार करता येते. मासिक सभेतील ठरावानुसार विस्तृत शेरा लिहिता येतो. धार्मिक / शैक्षणिक / सरकारी मालकीची इमारत ई. करामध्ये सुट देण्याची सुविधा आहे.

इतर सुविधा
  • मालमत्तेची चतुर्सिमा नोंदवण्याची सुविधा

  • कुटुंबातील इतर व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, जन्म तारीख इत्यादीची नोंद करण्याची सुविधा

  • आवास योजना किंवा अन्य कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याची टिप्पणी करण्याची सुविधा

content-image
video-preview
वार्षिक कर मागणी - नमुना ९
  • प्रतिवर्षी, पात्र इमारतीची विभागनिहाय नमुना ९ आणि मागणी बिले Automatic पद्धतीने तयार करता येतात. यामध्ये मागील वर्षाची थकबाकीची रक्कम देखील नोंदवता येते.

  • मागणी बिले अत्यंत दर्जेदार पद्धीने डिझाइन केलेली असल्याने सोप्या पद्धतीने कार्यालयात देखील प्रिंट काढता येतात. बिलांवर पुस्तक क्रमांक आणि बिल क्रमांक छापील येतो.

वार्षिक कर वसुली - नमुना १०
  • अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला वसुलीच्या नोंदी देखील मागणी बिलांनुसार करतात येतात. यामध्ये सूट आणि दंड देखील ग्राह्य धरले जातात.

  • वसुली नोंदी केल्यावर पुढील वर्षी मागणी बिलांमधील थकबाकी रक्कम वजा होते.

पाणीपट्टी आकारणी

मीटर रीडिंग पद्धत आणि वार्षिक बिलिंग पद्धत नुसार जलद पाणीपट्टी आकारणी

content-image
ग्रामपंचायतीने राबवलेल्या पाणीपट्टी योजनांची आकारणी

सुलभ पद्धतीने ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध पाणीपट्टी योजना आणि त्यातील लाभार्थी यांची नोंद करता येते. मीटर रीडिंग पद्धत आणि वार्षिक बिलिंग पद्धत अशा दोन्ही पद्धतीने पाणीपट्टी योजना तयार करता येतात.

मीटर रीडिंग योजनेमध्ये लाभार्थ्याचे प्रति महिन्याच्या वापराचे रीडिंग नोंद करता येते. मोबाईल ऍप्लिकेशन च्या माध्यमातून प्रत्यक्ष जागेवर जावून रीडिंग घेता येते.

ऑनलाईन वसुली

आपली वित्तीय बाजू मजबूत करून, आपली कार्यक्षमता वाढवा.

मालमत्ता कर, पाणीपट्टी कर आणि इतर फी यांची ऑनलाईन वसुली
  • ग्रामनिधी द्वारे नागरिक घरबसल्या आपली घरपट्टी, पाणीपट्टी यांची बिले क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि गुगल पे ई. पर्यायांसह ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात.

  • रक्कम नागरिकांच्या खात्यातून वजा होऊन, थेट ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये वर्ग होईल. बँक पासबुक मध्ये अशा व्यवहारांचा उल्लेख असेलच, शिवाय, आपल्यला दर दिवशी झालेल्या ऑनलाईन व्यवहारांचा विस्तृत अहवाल देखील मिळेल.

  • सूट आणि दंडाची रक्कम नियमानुसार ऑटोमॅटिक पद्धतीने नागरिकास दिसेल, व्यवहार यशस्वी झाल्यावर नमुना १० ची पावती देखील तयार होईल.

उपलब्ध पेमेंट पद्धती
  • payment-icon
  • payment-icon
  • payment-icon
  • payment-icon
  • payment-icon
  • payment-icon
  • payment-icon
content-image
content-image
अँड्रॉइड पॉस मशीन द्वारे आता नागरिकांच्या घरी जाऊन देखील वसुली शक्य
  • घरपट्टी वसुली करिता मालमत्ता क्रमांक द्वारे शोधल्यावर चालू आर्थिक वर्षाच्या वसूलपात्र रकमा दिसतील. क्कार्ड स्वाईप केल्यावर रक्कम थेट ग्रामपंचायतच्या खात्यात जमा.

  • पाणीपट्टी वसुली करिता मीटर रीडिंग घेणे आणि वसुली करणे या दोन्ही गोष्टी शक्य. पाण्याच्या वापरानुसार बिल तयार होणार आणि त्याची वसुली देखील त्वरित होणार.

  • ग्रामपंचायत मधील इतर फी आणि दंड इत्यादी देखील या मशीन द्वारे आपण सहज स्वीकारू शकतो.

  • वापरायला अतिशय सोपे आणि सुटसुटीत, मराठी भाषेमध्ये

  • HD टचस्क्रीन डिस्प्लेसह Android डिव्हाइस

  • त्रास-मुक्त बिलिंग अनुभव

  • व्यवहार झाल्यावर ऑडिओ द्वारे रकमेची खात्री, अतिरिक्त साउंड बॉक्स आवश्यक नाही

आमचे समन्वयक

ग्रामपंचायत कार्यप्रणालीचा अनुभव असलेले आमचे विभागनिहाय समन्वयक तुमच्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी आपल्या विभागात उपलब्ध आहेत.

कोंकण विभाग

सिनर्जी सिस्टिम्स,
श्री. प्रीतम प्रदीप गावडे, ५९५, श्रद्धासागर, एकदंत नगर, गयाळवाडी रस्ता, खेडशी, ता. जि. रत्नागिरी.
संपर्क - 9403033383

नागपूर विभाग

राम एन्टरप्रायझेस
सौ.निकिता शैलेश वाढई, ता. रामटेक, जि. नागपूर.
संपर्क - 8788260994

आपल्याला समन्वयक बनायचे आहे का? आमच्याशी संपर्क करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे

प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या माहितीकरीता आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट

ग्रामनिधी हे नेमकं काय आहे?

ग्रामनिधी हे एक ऑनलाईन ग्रामपंचायत कर आकारणी प्रणाली म्हणजेच सॉफ्टवेअर आहे ज्याद्वारे आपण ग्रामपंचायतचे कर आकारणी आणि वसुली कामकाज संगणकीकृत करू शकतो.

आपण मालमत्तांची नोंदणी कशी करू शकतो?

सोप्या पद्धतीने, अगदी ३ मिनिटांत. प्रत्येक मालमत्ता बाबत काही प्राथमिक माहिती आणि मालमत्तेचा तपशिलासह लगेच आकारणी करू शकतो. यामध्ये चतुर्सिमा, व्यक्तीची नोंदणी आणि लाभ घेतलेल्या योजना आदींचा देखील समावेश आहे.

चतुर्सिमा, व्यक्तीची नोंदणी इत्यादी तपशील गरजेचा आहे का?

नाही. चतुर्सिमा, व्यक्तीची नोंदणी आणि लाभ घेतलेल्या योजना हे तपशील वैकल्पिक (Optional) आहेत. आपल्या कार्यपद्धतीमध्ये मालमत्तेच्या चतुर्सिमा नोंद आपण घेत नसाल, तर आपण हे तपशील नोंद केले नाहीत तरी चालतील.

तयार होणारे सर्व नमुने आणि अहवाल डाउनलोड करता येतात का?

हो, येथे तयार होणारे सर्व नमुने आणि अहवाल डाउनलोड करता येतात. डाउनलोड केल्यावर गरजेनुसार आपण नागरिकांना इमेल, व्हॉटसअप द्वारे सहज पाठवू शकतो.

नमुना १० खतवण्याचे फायदे काय?

नागरिकांनी रक्कम भरणा केल्यानंतर नमुना १० मध्ये खतवल्याने पुढील वर्षी थकबाकी नोंदी टाकणे गरजेचे नाही, थकबाकी व दंड आपोआप तयार होतात. तसेच, चालू वर्षी थकबाकीदार यादी आणि भरणा यादी अहवाल मिळाल्याने वसुलीचे शिल्लक कामकाज सोपे होते.

मोबाईल वरून वापरता येऊ शकते का?

हो, मोबाईल वरून सर्व पर्याय आणि विभाग अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने वापरता येऊ शकते. आमचे स्वतंत्र मोबाईल ऍप्लिकेशन देखील आहे, जे तुम्ही प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून घेऊ शकता.

नागरिक ऑनलाईन पद्धतीने देय रक्कम भरू शकतात का?

हो, नागरिक जगभारातून कोठेही बसून, सुरक्षितरित्या घरपट्टी आणि पाणीपट्टी ची रक्कम ऑनलाईन भरू शकतात. हि रक्कम थेट ग्रामपंचायत च्या खात्यामध्ये जमा होईल. तसेच, आपोपाप खतवले जाईल. आपल्या अहवालामध्ये अशा व्यवहाराची स्पष्ट नोंद असेल.

ग्रामनिधी हे सॉफ्टवेअर आणि त्यामधील माहिती सुरक्षित आहे का?

हो, अर्थातच. या सिस्टीम मध्ये अत्युच्य दर्जाची सुरक्षा यंत्रणा प्रस्थापित केलेली आहे. जगभरातील आय.टी. सुरक्षा बाबतीतल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचा येथे वापर केला आहे.

आणखी प्रश्न आहेत? तुमचा प्रश्न इथे विचारा

ग्रामनिधी द्वारे आपले कामकाज संगणकीकृत करण्याकरिता आमच्याशी आजच संपर्क करा.